गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापुरातील मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मीलमधील ऐतिहासिक असणारी चिमणी आज पाडण्यात आली आहे. अंतरिक्ष इन्फ्राकॉन या कंपनीच्या मालकी असलेल्या जागेतील ही चिमणी धोकादायक असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने दिला होता. त्यानंतर खासगी कंपनीतर्फे ही ऐतिहासिक चिमणी पाडण्यात आली.
ही चिमणी पडण्यासाठी जवळपास पावणे दोन तास लागले. सोलापूरच्या मरीआई चौकातील लक्ष्मी-विष्णू मिलची अखेरची ओळख आज संपुष्टात आली. सोलापूर महापालिकेने या मिलला धोकादायक शेरा दिल्याने ही ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे.