उद्यापासून पुढील 2 महिने……

31 मे दिवस यावर्षीच्या मासेमारी हंगामातील शेवटचा दिवस आहे. रत्नागिरीतील हर्णे बंदरातील  मासळी लिलाव पुढील दोन महिने बंद राहणार आहेत. यामुळं कोट्यावधी रुपयांची उलाढाल देखील ठप्प होणार आहे. पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असल्याने मासेमारी बंद राहणार आहे.

समुद्रातील मासेमारीला दरवर्षी पावसाळ्यात एक जून ते 31 जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून बंदी घालण्यात येते. या कालावधीत यांत्रिक मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आता चालू हंगामातील मासेमारीला केवळ एकच दिवस शिल्लक असून एक जून पासून मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं हर्णे बंदरातील लिलाव पुढील दोन महिने बंद राहणार आहे.