पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली पंचगंगा घाटाची पाहणी!

गतवेळच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरूवारी पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने आपत्कालीन व्यवस्थाबाबतची उपलब्ध साधन सामग्रीची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी येडगे यांनी महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. पाहणीवेळी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी उपलब्ध साधन सामग्रीची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.

यामध्ये यांत्रिक बोट, फायबर बोट, कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर, स्लायडिंग शिडी, फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर याचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असल्याची माहिती घेऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास ती यशस्वी पणे हाताळण्यासाठी उपलब्ध साहित्याचे अचूक नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.