तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? 4 जूनकडे सर्वांच्याच नजरा….

सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासून हा मतदारसंघ चर्चेत होता. शेवटी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) या दोन उमेदवारांमध्येच आता खरी लढाई असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकर्त्यामध्ये पैजे लागल्याची एक पोस्ट सोशल मिडियावर तूफान वायरल होते आहे.

या मतदारसंघातून काँग्रसचे नेते विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, ही जागा शिवसेना “ठाकरे गटाला सोडण्यात आली. चंद्रहार पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. त्याबदल्यात सांगलीची जागा शिवसेना सोडल्याचे सांगण्यात आले.

मात्र, यानंतर सांगली काँग्रेसमध्यो मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघातून विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे.दरम्यान, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते. सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीवारी देखील केली होती. मात्र, अखेर उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्यानं सांगली काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळाली.येत्या 4 जूनला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामुळं या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.