भाजपरुपी रावणाचे दहन करण्यासाठी हसन मुश्रीफ यांना मुद्दाम रावणाच्या जवळ पाठविले असून सर्वांनी मिळून भाजपरुपी रावणाचे दहन कार असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. जवाहरनगर येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचा शुभारंभ आमदार जयंत पाटील यांचे हस्ते आणि प्रांतिक सदस्य मदन कारंडे, इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे, माजी नगरसेविका शकुंतला मुळीक यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. प्रारंभी स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष बाजीराव कुंभार यांनी केले.
प्रास्ताविकात संदीप मुळीक यांनी श्रीराम ट्रस्टच्या कार्याचा आढावा विषद केला. यावेळी सचिन माने डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक गीतावरील नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रावणाचे दहन करून सिमोल्लंघन करत सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला अबालवृद्धासह नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.