इचलकरंजी येथील नवदुर्गा महोत्सव २०२३ यांच्या मार्फत संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेत प्रशालेची इयत्ता ९ वी मधील विद्यार्थीनी सायमा शकील जमादार हीने प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्वल केले. सायमा हिला कमिटीकडून शिल्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू मिळाली.
कु.सायमा हिला प्रशालेचे चित्रकला विभागप्रमुख सिध्दू सुतार व अभिजित पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका एम.एस. रावळ यांची प्रेरणा मिळाली. मार्गदर्शक शिक्षक यांचा संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे सेक्रेटरी महेश कोळीकाल, मुख्याध्यापिका एम.एस. रावळ व उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर यांनी सत्कार केला व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.