वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने अतिक्रमण विरोधात कारवाई केली जात आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश दिवटे यांनी अतिक्रमण विभागास शहरांमध्ये ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे.
इचलकरंजी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने शहरातील पंचवटी टॉकीज परिसर तसेच सुवर्ण चौक, सुतार मळा आदी स ठिकाणी कारवाई करुन अतिक्रमण केलेले १६ हातगाडे हटविणेत आले.
तसेच काळा ओढा परिसराची पाहणी करून तो स्वच्छ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी दिल्या.