कर्जबाजारीमुळे नातवानेच केला आजीचा गळा दाबून, डोके आपटून खून….

गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु असल्याने तरुणाई याला बळी पडत आहे. किरकोळ कारणातून होणारी वादावादी एखाद्याचा जीवच घेऊ लागली आहे. इचलकरंजी शहरात असा प्रकार उघडकीस आला आहे ज्यामुळे शहरातील जनतेत भीतीच निर्माण झाली आहे.

कर्जबाजारी नातवाने आजीकडे पैशांची मागणी केली. आजीने नकार दिल्याने मित्रांच्या मदतीने ८२ वर्षांच्या आजीचा त्याने खून केला. तिचे सोने घेऊन पोबारा करणाऱ्या संशयित आरोपी नातवाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रीत अटक केली. कर्जबाजारी नातवाने आजीकडे पैशांची मागणी केली. आजीने नकार दिल्याने मित्रांच्या मदतीने ८२ वर्षांच्या आजीचा त्याने खून केला. तिचे सोने घेऊन पोबारा करणाऱ्या संशयित आरोपी नातवाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रीत अटक केली.

गणेश राजाराम चौगले (वय २२, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. गणेश, त्याचा मित्र नरेश ऊर्फ नरेंद्र दगडू करपे (वय २५, विक्रमनगर, इचलकरंजी) याच्यासह एका अल्पवयीनला इचलकरंजी शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सगुणा तुकाराम माधव ही गणेश चौगलेची आजी येथील भोई गल्लीत एकटीच राहते. गणेश हा तिच्या मुलगीचा मुलगा. तो कर्जबाजारी झाला आहे. त्याने पैशासाठी इचलकरंजी येथील राहते घरही विकले आहे. त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी आजीकडे पैशांची मागणी केली.

आजीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्या रागापोटी तो त्याचा मित्र नरेश ऊर्फ नरेंद्र दगडू करपे व एका अल्पवयीनला घेऊन काल दुपारी आजीच्या घरी आला. त्यांनी आजीचा गळा दाबून, डोके आपटून खून केला. आजीच्या पाटल्या, कर्णफुले असे चार तोळे सोने घेऊन दरवाजाला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला. रात्री सव्वाआठच्या सुमारास जवळच्या गल्लीत राहणारी सगुणा यांची सून सुनंदा पुंडलिक माधव त्यांचे जेवण घेऊन गेल्या. त्यांना दरवाजाला कुलूप पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी आजीची शोधाशोध केली. पती पुंडलिक यांना तसे सांगितले. पुंडलिक यांनी कुलूप तोडून दरवाजा उघडला. तेव्हा आई सगुणा माधव हिचा मृत्यू झाल्याचे आढळले. याबाबत त्यांचा मुलगा सुशांत माधव यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली.