पंढरपुरात मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात, अनेकांच्या घरात पाणी

पंढरपूर शहर व तालुक्याला काल (दि. 06) रात्री मेघगर्जनेसह दमदार पावसाने (Rain) चांगलेच झोडपले. सायंकाळी सातच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने परिसराला जोरदार झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले.तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर राज्यात उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळत आहे. पंढरपूरमध्ये (Pandharpur Rain Update) गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पंढरपूरकरांना संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आल्हाददायक दिलासा मिळाला.