पुढील 48 तासांसाठी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट!

पुढील 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

आज ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल.