प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2024

 PM Mudra loan Yojana सरकारने देशातील सर्व नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचे नाव आहे मुद्रा लोन योजना Mudra loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये तुम्हाला 50 हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपये पर्यंत लोन मिळू शकते जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे आर्थिक मदत नाहीये तर त्यासाठी तुम्ही या मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुद्रा लोन योजनेसाठी काय आहेत आवश्यक बाबी PM Mudra Loan

या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचा जामीन लागत नाही म्हणजेच हमीदार लागत नाही.  

कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज करावे लागत नाही.

तुमच्या स्वतःचे भाग भांडवल ठेवण्याची गरज नाही.

अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत.

या योजनेचा लाभ सरकारीबँकेतून घेता येईल.

PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा लोन
कधी सुरू झाली8 एप्रिल 2015
कर्ज रक्कम50 हजार ते 10 लाखापर्यंत
उद्देशव्यवसायासाठी प्रेरित करणे
प्रकार3 प्रकार शिशु, किशोर, तरुण
कर्ज कुठे मिळतेसरकारी बँक
लाभार्थीलहान व मध्यम व्यावसायिक
कसा करावा अर्जऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://www.mudra.org.in/

PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा काय आहे लाभ ?

PM Mudra Loan मुद्रा लोन योजनेत हमीदराची आवश्यकता नाही तसेच कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या मुद्रा लोन योजनेच्या कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे. ज्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज घेतलेले आहे. त्यांना एक मुद्रा कार्ड मिळते त्या मुद्रा कार्डच्या सहाय्याने उद्योगासाठी आवश्यक तेवढा खर्च केला जाऊ शकतो.

कोणाला मिळतो मुद्रा लोन योजनेचा लाभ ?

PM Mudra loan Yojana देशातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, त्यांना PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेत येते.  

  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध केलेले आहेत.
  • शिशु मुद्रा लोन :- या शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.  
  • किशोर मुद्रा लोन :- किशोर मुद्रा लोन या कर्ज प्रकारात 50000 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.
  • तरुण मुद्रा लोन :- तरुण मुद्रा लोन या प्रकारात पाच लाखापासून ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणाला कर्ज मिळू शकते ?

एकमेव मालक, पार्टनरशिप, सेवा क्षेत्रातील कंपन्या, छोटे उद्योग, दुरुस्ती दुकाने, ट्रक मालक, अन्न संबंधित व्यवसाय, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म, आदि  

पीएम मुद्रा लोन योजनेचे फायदे

PM Mudra loan Yojana ज्या व्यक्तीला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हमीदराशिवाय या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते आणि त्यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेड कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. या योजनेत कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला एक मुद्रा कार्ड mudra card मिळते व्यवसायासंबंधीत गरजांवर या कार्डच्या मदतीने खर्च करता येईल.

मुद्रा लोनसाठीची आवश्यक कागदपत्रे

  • कर्जदाराचे आधार कार्ड
  • कर्जदाराचे पॅन कार्ड
  • कर्जदाराचा पत्ता
  • व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शॉप अॅक्ट लायसन
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल

मुद्रा लोन योजनेसाठीची पात्रता

Eligibility of PM Mudra Loan Yojana

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.  
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.  
  • तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.  
  • ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे ते या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 अंतर्गत अर्ज करू शकतात.  

या बँकमध्ये मिळते कर्ज

  1. बँक ऑफ इंडिया
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. कॉर्पोरेशन बँक
  4. आयसीआयसीआय बँक
  5. अलाहाबाद बँक
  6. पंजाब बँक सिंध बँक
  7. सिंडिकेट बँक
  8. युनियन बँक ऑफ इंडिया
  9. बँक ऑफ महाराष्ट्र
  10. आंध्रा बँक
  11. कोटक महिंद्रा बँक
  12. आयडीबीआय बँक
  13. कर्नाटक बँक
  14. पंजाब नॅशनल बँक
  15. तमिळनाडू मार्क कंटाइल बँक
  16. ॲक्सिस बँक
  17. कॅनरा बँक फेडरल बँक
  18. इंडियन बँक
  19. सारस्वत बँक
  20. युको बँक
  21. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  22. एचडीएफसी बँक
  23. इंडियन वर्सेस बँक
  24. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  25. युनियन बँक ऑफ इंडिया

कसा करावा ऑनलाईन अर्ज

Mudra Loan Online Application 

सर्वप्रथम वरती दिलेल्या सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर  https://www.mudra.org.in/ जाऊन मुद्रा लोन PM Mudra Loan Yojana अर्ज डाऊनलोड करा. हा डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या. सोबत त्याला आवश्यक कागदपत्रे जोडा. रेफरन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करा. संदर्भ आयडी म्हणजेच रेफरन्स आयडी हा तुमच्याजवळ जपून ठेवा. कारण कर्जाची पुढची  प्रोसेस करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल कर्जाचा अर्ज आणि तुम्ही जोडलेली आवश्यक कागदपत्रे हे तपासून झाल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर होईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा केली जाईल.

कसा करावा ऑफलाइन अर्ज PMMY apply offline

PM Mudra Loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तुम्हाला मुद्रा कर्ज घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी बँकेला भेट द्या. बँकेतून कर्जाचा अर्ज घ्या. तो काळजीपूर्वक वाचून भरा. आणि त्याला आवश्यक ते कागदपत्रे जोडून तो कर्जाचा अर्ज सबमिट करा. बँकेसोबत कर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल

मुद्रा कर्ज योजनेचा व्याजदर

PM Mudra Loan Interest Rate

पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर 8.80% पासून सुरू होतो.

यूनियन बँक ऑफ इंडिया बँकेचा व्याजदर 10.30% पासून सुरू होतो.

सारस्वत बँकेचा व्याजदर 11.65% पासून सुरू होतो.

सिटी युनियन बँकेचा व्याजदर 12% ते 12.65%

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा व्याजदर 8.65% ते 16.95%