विट्यात कासाबाई गायकवाड यांना ‘आदर्श माता’ पुरस्कार….

विटा येथे आदर्श माता पुरस्कार सुजाता साळुंखे यांच्या हस्ते कासाबाई गायकवाड यांना प्रदान केला. यावेळी आनंदीताई पवार उपस्थित होत्या.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वच निवडणुकांत मतदान करून आदर्श नागरिक सन्मान मिळविलेल्या आणि आपली मुले, मुली, नातवंडे, परतवंडे, खापरतोंडे अशा कुटुंबांतील जवळपास ९४ जणांसह देश-विदेशांत उच्चशिक्षितांना मार्गदर्शन व संस्कारित करणाऱ्या खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथील कासाबाई काकासाहेब गायकवाड यांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले.अखिल भारतीय नॅशनल गोल्ड आणि सिल्व्हर संघटनेच्या महिला समितीच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. विटा येथे संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्या पत्नी सुजाता साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.