वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड भागातील म्हाळुंगे येथील विवाहितेने सासराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकारणी म्हाळुंगे पोलिसांनी दोघांना परभणीतून ताब्यात घेतले आहे.

माहेरहून 50 हजार रुपये आणावे यासाठी महिलेकडे सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.पूजा निर्वळ, वय 22 वर्ष, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यादव यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 27 एप्रिल 2025 रोजी ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचा पती गजानन निर्वाळ हा परभणी येथील राहणारा आहे. पुण्यातील म्हाळुंगे परिसरात ते वास्तव्यास होते. नवरा गजानन आणि नणंद यांनी पूजाने माहेरहून 50 हजार रुपये आणावे यासाठी तिचा छळ लावला होता. या छळला कंटाळून अखेर पूजाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर नवरा आणि नणंद फरार झाले होते. मात्र पूजाने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होता. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता परभणीमध्ये जाऊन अटक केली आहे.
