Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात

हिरामंडी या वेबसीरिजमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री आपला बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत येत्या 23 जूनला लग्नबंधनात अडकू शकते. रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि जहीर खाजगी पद्धीतीत लग्नबंधनात अडकणार आहेत. निवडक पाहुण्यांना या लग्नसोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

सोनाक्षीच्या लग्नसोहळ्याला ‘हीरामंडी’ सीरिजच्या संपूर्ण टीमची विशेष उपस्थिती असणार आहे. अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

सोनाक्षी आणि जहीरने ‘डबल XL’ नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत. नाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, सोनाक्षी आणि जहीर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.