महापालिकेसाठी इच्छुकांनी केली चाचपणी!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात २५५ पैकी तब्बल २१४ मतदान केंद्रांत आघाडी घेत विजय मिळवला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक इच्छुक सक्रिय झाले होते. संभाव्य प्रभागांतून यंत्रणा गतिमान करीत राजकीय ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काहीजण उत्तीर्ण झाले, तर काही जणांना आणखी जोमाने काम करण्याचा इशारा दिला. आता पुन्हा एकदा इच्छुकांना विधानसभा निवडणुकीत रंगीत तालीम घेता येणार आहे.