विटा बसस्थानकाचा कायापालट होणार! सुहास बाबर यांचे आश्वासन

विटा बस स्थानकातील रस्त्यांबरोबर बसस्थानकाचे नूतनीकरण करणार असल्याचे सुहास बाबर यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बसस्थानकाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. तर बस स्थानकातील रस्ते आणि बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी मंजुरी देखील मिळालेली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी दिली आहे.

विटा बसस्थानक जिल्ह्यातील एक नंबरचे बसस्थानक करण्यासाठी जोरदार यंत्रणा सुरू झालेली आहे. युवा नेते सुहास भैया बाबर यांनी बस स्थानकाचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे.