डॉ. ऋचा आत्महत्या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी….

भाऊसाहेब रूपनर यांच्या निवासस्थानी डॉ. ऋचा सूरज रूपनर यांनी दि. ६ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी सासरे भाऊसाहेब रूपनर व पती डॉ. सूरज यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले.

यात पती डॉ. सूरज यांना दि. १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी तर सासरे भाऊसाहेब यांना दि. १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीप त्रकाद्वारे दिली.सांगोल्यात डॉ. ऋचा यांनी दि. ६ जून रोजी गळफास घेतला. त्यांच्या भावाने सांगोला पोलिसात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपी पती डॉ. सूरज, सासरे भाऊसाहेब, सासू सुरेखा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.मंगळवारी पंढरपुरातील डॉक्टरांनी सांगोला पोलिस ठाण्यात ठिय्या मारल्यावर रात्री सासरे भाऊसाहेब यांना कोल्हापुरातून ताब्यात घेतले. पती डॉ.सूरजला मोबाइल लोकेशनवरून अनकढाळमध्ये ताब्यात घेतले.

तिसऱ्या संशयित आरोपी सासू सुरेखा रूपनर या गायब असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेत आहोत, असे पोलिस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी सांगितले