गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात होते. मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा 17 वा हफ्ता जमा होणार आहे.
म्हणजेच आज शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणआर आहे. देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारताच मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली. त्यानंतर 18 जून रोजी शेतकऱ्यांना ही मदत मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते.
सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना फार मदत होणार आहे.
