राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती आजपासून सुरू होतेय. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार (Maharashtra Police Bharati) आहे. ही भरती प्रक्रिया राज्यात सुरू होणार आहे.
पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी १७,४७१ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालीय. पहाटे पाच वाजल्यापासून कसबा बावडा इथल्या पोलीस परेड ग्राउंडवर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी 154 तर पोलीस चालक पदासाठी 59 पदांच्या भरती प्रक्रिया होत आहे.
यासाठी एकूण 11 हजार 445 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया आजपासून 27 जून या कालावधीत राबविण्यात येणार येत आहे.दरम्यान यंदा पहिल्यांदाच भरती प्रक्रियेमध्ये अचूक वेळ मोजण्यासाठी आणि उमेदवार डमी होऊ नये, याकरिता अत्याधुनिक पद्धतीचे RFID आणि FACE Recognation या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे.
