तुम्हीही नुकतेच 10वी परीक्षा पास झाला असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजेच सरकारी बँकेत नोकरीची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरतीची नोटिफिकेशन काढली आहे. त्यानुसार ”सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ” या पदांसाठी ही भरती राबविली जात आहे.
दहावी पास उमेदवारांना बँकेत नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 पर्यंतच आहे. या भरतीद्वारे एकूण 484 जागा भरल्या जातील.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
इतका पगार मिळेल : या पदांसाठी पात्र उमेदवारांना दरमहा 19,500/- ते 37,815 पर्यंत पगार मिळेल
वयाची अट :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]