हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असणार……

लोकसभा निवडणुकीनंतर आता अनेक नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्यावतीने खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार समारंभ व आभार दौरा आयोजित करण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले. आणि जनतेने मोठ्या विश्वासाने दुसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्या विश्वासास पात्र राहत देशातील प्रमुख मतदारसंघात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा समावेश होईल असे काम करणार असल्याचे प्रतिपादन खास. धैर्यशील माने यांनी केले.