ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा (Vat Purnima) सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात.वटपौर्णिमेला काही भागांत ‘वटसावित्री’ या नावाने देखील हा सण साजरा करतात.आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे ते जाणून घेऊयात.
वटपौर्णिमा 2024 पूजेचा तिथी
यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील. पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी सुरु होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी संपेल.
वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त
वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत
या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.