मनसे आगामी विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार…..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्मान सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत मनसेच्या कोअर ग्रुपची महत्त्वपूर्ण बैठक झाली.मनसे आगामी विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

सर्व पक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (24जून) मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मनसे आगामी विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी माहिती दिली. जुलैमध्ये आपण महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही राज यांनी सांगितले.