खानापूर आटपाडी मतदारसंघात जोरदार हालचाली!

काही दिवसांवरच विधानसभा निवडणूक आलेली असतानाच राजकारणात अनेक हालचाली सुरू होतानाचे चित्र आपणाला पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी आपली इच्छा देखील दाखवली आहे तसेच अनेक नेत्यांकडून निवडणुकीसाठी हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत.

अशातच चांगली जिल्ह्यात खानापूर आटपाडी मतदार संघाच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून खानापूर आटपाडी मतदारसंघात जोरदार यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात झालेली आहे. सुहास भैय्या बाबर वैभव दादा पाटील यांच्या विरोधात जितेशभैय्या कदम मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून खानापूर मतदार संघातील विरोधी गटाच्या दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणात खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जोरदार हालचाली केल्याची माहिती सांगण्यात येत आहे.जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगण्यात येत आहे.

जितेश भैयांच्या उमेदवारीसाठी खानापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून मोठा सर्वे देखील सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी सुहास भैय्या बाबर आणि वैभव दादा पाटील यांना जितेश भैया कदम टक्कर देणार का? खानापूर आटपाडी मतदार संघात मोठी खळबळ उडणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईलच.