‘या’ तारखेपासून विठ्ठल-रूक्मिणी मातेचं २४ तास दर्शन!

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन 7 जुलैपासून 24 तास सुरू राहणार आहे. मंदिर समितीच्यावतीने माध्यमांना ही माहिती देण्यात आली. आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १७ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आलं आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचे आयोजन करण्यात येणार आहे.