शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गाव तिथे युवासेना शाखा’ ही संकल्पना राबवून शिवसेना अधिक मजबूत करू. त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेत युवकांची मजबूत फौज उभी करत युवासेनेचा वेगळा ठसा दाखवण्यासाठी युवासैनिकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी केले.
रेंदाळ ता. हातकणंगले येथे आयोजित युवासेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे जाळे महाराष्ट्रभर युवासेना हातकणंगले मतदारसंघ लोकोपयोगी योजना व उपक्रम घरोघरी पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहावे अशी भावनाही शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली.
रेंदाळ येथे युवासेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना युवासेनेचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव. पसरले असून हातकणंगले लोकसभा क्षेत्रातही आपली चांगली ताकद आहे.
येणाऱ्या काळात गाव तिथे युवासेना शाखा ही संकल्पना हाती घेत युवासेनेच्या सर्वच शाखांनी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी, शिक्षण, उद्योग यांसह समाजातील प्रमुख प्रश्नांवर अग्रभागी राहावे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अजित उगळे यांनी केले.