पुतळा समितीचे खजिनदार वीर कुदळे यांचा राजीनामा

आष्टा येथील माजी नगरसेवक व वीर कुदळे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीचे खजिनदार वीर
कुदळे यांनी विविध शासकीय विभागांच्या परवानग्या घेण्यात आणि बैठका घेण्यात सातत्य नसल्यामुळे पदाचा राजीनामा दिला आहे वीर कुदळे म्हणाले,” नगरसेवक असताना २०१७ मध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी चौकात होण्यासाठी संघर्ष केला.

पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी वार्षिक बजेटमध्ये सुरुवातीला १५ लाखांची तरतूद सर्वानुमते केली माजी आमदार विलासराव शिंदे पुतळ्यासाठी आग्रही होते ते असताना नियमित बैठका होत असत मात्र त्यांच्या पश्चात पाच वर्षांत केवळ पाच ते सहा बैठका झाल्या तीस जणांची जम्बो कार्यकारिणी असताना सातत्य नसल्यामुळे चार-पाच लोकांचा अपवादवगळता कोणालाच उत्साह नसल्याचे दिसून येत आहे.नामधारी पुतळा समितीकडून शिवभक्तांची निराशा होत आहे.

शिवाजी महाराज चौकात १५ व्या वित्त आयोगातून बगीच्यासाठी लाखांची तरतूद केली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. खासदार धैर्यशील माने यांनी अकरा लाखांचा निधी दगडी कंपौंडसाठी दिला आहे.
शिवभक्तांच्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे शासनाकडून पालिकेकडे जागा हस्तांतरित होऊन दोन वर्षे झाली आहेत .या जागेत बगीच्या आरक्षण आहे या जागी पुतळ्याचे आरक्षण गरजेचे आहे सदस्यांना उत्साह राहिलेला नसल्याने कुदळे यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे