राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला!

सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांचा सोलापूर शहरात ऋणानुबंध सवांद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मतमोजणी नंतर तब्बल पंचवीस दिवसानंतर राम सातपुते सोलापूर शहरात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम सातपुते माळशिरस विधानसभा मतदार संघात सक्रिय झाले होते.

ऋणानुबंध कार्यक्रमात राम सातपुते यांनी भाषणातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिम्मत देत हरलो तर खचून जाऊ नका, पण हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये असा शाब्दिक टोला विरोधकांना लगावला आहे.सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे निवडणूक जिंकल्यापासून आजतागायत फक्त स्टंटबाजी करत आहेत. त्यांनी विकासाचा राजकारण, असा शाब्दिक टोला राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंना लगावला आहे. जसा पराभव पचवता येतो तसा विजय देखील पचवणे महत्वाचे आहे. प्रणिती शिंदेनी वाचाळ बडबड करू असे राम सातपुतेंनी सल्ला दिला आहे. हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये हे वाक्य भाषण करताना, आमदार राम सातपुते यांनी केले आहे.