मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता. माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली.
दरम्यान त्यांनी मराठा समाजातील तरुणांना, आपल्या गावात आमरण उपोषण सुरू केलं असेल तर पोलीस ठाण्यात माहिती, अर्ज द्या. आत्महत्या करू नका, असं आवाहन करतानाच आपल्यातील एकजुटीत फुटू देऊ नका. सरकारशी संवाद नाही. आणखी 3 दिवस सरकारची वाट बघू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर आमची ताकद त्यांना दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरक्षण देऊ असं का म्हणत नाहीत, फक्त सावंत का म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात कोणी बोळे घातलेत का. फडणवीस यांनी फक्त एकदा चर्चेला यावं, त्यांना कोणी अडवणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
