इचलकरंजीत अक्ष्येपार्य स्टेटस ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

इचलकरंजी शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्ष्येपार्य स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तहिद ताजादिन सय्यद राहणार नवीन नगरपालिका समोर तसेच गावभाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विक्रम नगर परिसरातील रियावान मनीयार या दोघा मित्रांनी अक्ष्येपार्य स्टेटस ठेवल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच गाव भाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

इचलकरंजी शहरातील नवीन नगरपालिकेसमोर राहणारा तहिद सय्यद यांनी अक्ष्येपार्य स्टेटस ठेवला होता व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे स्टेटस ठेवल्यामुळे त्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळतात शिवाजीनगर पोलिसांनी सय्यद सय्यदवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व त्याचाच मित्र राहणार विक्रमनगर परिसरातील रीयावान मणियार यांनी सुद्धा अक्ष्येपार्य स्टेटस ठेवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखा मजकूर ठेवला होता व फोटो ठेवला होता. याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या दोघांना बोलावून समज दिली व नोटीस बजावली आहे. पुन्हा असे स्टेटस ठेवू नये अशी समज दिली.

जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अक्ष्येपार्य स्टेटस ठेवल्या प्रकरणी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे. अशा प्रवृत्तीवर सायबर गुन्हे शाखा लक्ष ठेवून आहेत जर असं कोणी केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्यात झालेली आहे.