कार्वे येथे चक्क मंदिरात चोरी!

अलीकडे दिवसेंदिवस चोरीच्या घटनात खूपच वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या बंद घरावर डल्ला मारत आहेत. वाळवा तालुक्यातील कार्वे येथे अशीच एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. कार्वे (ता. वाळवा) येथील पद्मावती मंदिरातील ७ किलोची पितळी समई अज्ञाताने लंपास केली ही घटना सोमवारी रात्री घडली.

कार्वे गावच्या पश्चिमेला पद्मावती देवीचे मंदिर आहे. या मंदिरात सात किलो वजनाची समई सभामंडपात ठेवली होती. मंगळवारी सकाळी मंदिराचे पुजारी प्रकाश गुरव मंदिरामध्ये आले असता ही समई चोरीस गेल्याचे लक्षात आले. समईची किंमत सुमारे ७ हजार रुपये आहे. यापूर्वीही मंदिरातून समई चोरीस गेली होती.