केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व महापालिका क्षेत्रात विविध योजना राबविल्या जातात. याची सध्यस्थिती माहिती होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व महापालिकेमध्ये सुरू असलेल्या योजना व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात केंद्रांकडे पाठपुरावा करण्यासाठी खासदार विशाल पाटील जिल्हा परिषद व महापालिकेमध्ये शुक्रवारी आढावा बैठक घेणार आहेत.
या बैठकीत ते प्रमुख अधिकारी व काही माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शिवाय केंद्राच्या अनेक नव्या योजना आहेत. जिल्हा परिषद व मनपा क्षेत्रात कोणत्या योजना राबविण्यात येतील? यावर देखील बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच खासदार निधीतून जिल्हा व मनपा क्षेत्रात कोणती कामे केली जाणार? यावर देखील चर्चा होणार आहे.