शरद पवाराकडून दुसरा धमाका,आणखी एका तरुण उमेदवाराची

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपल्या नवीन राजकीय पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं असून काल त्यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील अकोले येथे दिवंगत अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा व शेतकरी मेळावा पार पडलाया मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षरीत्या घोषणा केली असून या तरुण नेत्यामागे आपली ताकद उभी करा, असं आवाहन लोकांना केलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सांगली दौऱ्यात असताना दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची विधानसभेसाठीची उमेदवारी जाहीर केली होती. अकोले येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आता शरद पवारांनी इथं तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत त्याच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, “अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही पाठीमागे राहा आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताकतीने आम्हा लोकांची मदत असेल . मी तुम्हाला खात्री देतो की, अकोले तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही.

५ वर्षांपूर्वी एका डॉक्टरला निवडून दिलं, मीच तुम्हाला सांगितलं निवडून द्यायला. मला असं वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल, लोकांना पाठिंबा देईल, लोकांची साथ सोडणार नाही इथे भाषण केलं काही झालं तर पवार साहेबांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला भलती तिकडेच जाऊन बसला. आता कुठे बसायचं? हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी ठरवायचं आहे आणि हे काम तुम्ही करा आणिया तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा,” अशी साद पवार यांनी जनतेला घातली आहे.