विट्यात चारचाकी आणि एसटीचा भीषण अपघात……

विट्यामध्ये कुंडल रस्त्यावर एसटी बस आणि चारचाकी या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे. कुंडलच्या नाक्या वरील वळणावर एसटी बस आणि चारचाकी ची जोराची धडक झाल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. या झालेल्या भीषण अपघातामध्ये चार चाकीचा चक्काचुरा झालेला आहे. तसेच चालक जखमी झालेला आहे.

रणजीत गायकवाड असे अपघातातील जखमी तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट घेतली. विटा पलूस एस टी बस ही विट्या कडून पलूस कडे निघालेली होती. तर सांगली रस्त्याकडून येणारी चार चाकी ही सांगोल्याकडे निघालेली होती.

विट्यातील कुंडल नाक्यावर एसटी बस व चारचाकी चा भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये एसटी बसला बाजूला धडक दिल्यामुळे चार चाकीचा चक्काचुरा झालेला आहे. तर चालक गंभीर जखमी झालेला आहे. ही चारचाकी पंढरपूर बलवडी सांगोला येथील असून रणजीत राजेंद्र गायकवाड हा तरुण जखमी झालेला आहे. त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याचे सांगण्यात येत आहे.