खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू! मध्यरात्री आंदोलन……..

सध्या गुन्हेगारी प्रमाणात तर वाढ होतच त्याचप्रमाणे खुलेआम वेश्याव्यवसाय देखील सुरु आहेत. अशातच कोल्हापुरमधून एक मोठी बातमी समोर आलीय. शहरातील विविध चौकांमध्ये रात्रीच्या वेळी खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.व्हीनस कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात हा प्रकार सुरू होता. याविरोधात कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक झाली. मध्यरात्री जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांना पिटाळून लावलं.

शाहूपुरी पोलिसांनी अनेक महिला आणि तृतीयपंथीयांना यावेळी ताब्यात घेतलं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला व्हीनस कॉर्नर परिसरात असणाऱ्या अनेक लॉजमध्ये लपलेल्या होत्या. या लपलेल्या महिलांना शोधून काढत शिवसैनिकांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं होतं.

शहरातील वेश्याव्यवसायामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने व्हीनस कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे शाहूपुरी पोलिसांची प्रचंड दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.