पंचगंगा आणि भोगावती नदीतून शेतीसाठी उपसाबंदी!

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम २०२३-२४ मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही क्षेत्रात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर आज ०२ शुक्रवार ते ५ फेब्रुवारी दरम्यान उपसाबंदी करण्यात आली आहे.

भोगावती नदीच्या दोन्ही तीरांवरील भाग व कासारी नदीवरील ठाणे-आळवे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरांवर व कुंभी नदीवरील सांगरुळ बंधाऱ्याच्या खालील बाजूस कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमापर्यंत दोन्ही काठावर मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या भागात आजपासून उपसाबंदी करण्यात आली आहे.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना १ वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.