मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची बदली पंढरपूर येथील मंदिर सुरक्षा विभागाकडे झाली असून त्यांच्या जागेवर तेथून पो.नि.महेश ढवाण हे रात्री उशीरा मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झाले असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. पो.नि.रणजीत माने यांनी आपला दोन वर्षाचा प्रशासकीय कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांना निवडणूकीच्या तोंडावर मुदतवाढ मिळाली होती. माने यांनी कार्यभार घेतल्यानंतर
तत्कालीन पो.नि.गुंजवटे यांच्या कारकिर्दीत पडलेल्या दरोड्यांचा तपास त्यांनी यशस्वीरित्या लावून दरोडेखोरांना जेरबंद केले होते.नव्याने कार्यभार स्विकारलेले पो.नि.महेश ढवाण हे पंढरपूर मंदिर सुरक्षा विभागाकडे कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार रात्री उशीरा स्विकारला असूनमागील दोन आठवड्यात चोर्यांचे प्रमाण भरदिवसा वाढल्याने त्या चोर्यांचा तपास करणे व कारखाना रोडवरून होणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणे त्यांच्यापुढे एक आव्हान आहे.