गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अश्या घोषणा देत श्री गणेशाचे सांगोला शहरातील घरगुती व मंडळाच्या गणपतीसह तालुक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. तर तालुक्यातील सुमारे २९० सार्वजनिक मंडळाची पूर्व परवानगीचे जोरदार स्वागत करीत स्थापना करण्यात आली. ढोल , ताशा , हलगी या पारंपरिक वाद्याच्या तालात रात्री १० वाजेपर्यंत मंडळांनी आपल्या गणेशाची विधिवत स्थापना केली.
श्री गणेशाच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्य विक्रीच्या दुकानांनी शहरातील शिवाजी चौक , नेहरू चौक, व जयभवानी चौक फुलून गेला होता. सकाळी ११ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनी ढोल , लेझीम च्या तालात जल्लोषात स्वागत करीत श्री गणेशाची स्थापना केली. चालू वर्षी तालुक्यातून सुमारे १७१ सार्वजनिक गणेश मंडळांनी रीतसर परवानगी घेत मूर्तींची प्रतिष्ठपणा केली आहे. त्यामध्ये शहरातील ६१ मंडळीनी रीतसर पोलीस स्टेशनला परवाना घेत गणेश उत्सवाला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात केला होता.
