फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौडवाडी (ता.सांगोला) येथील विद्या पांडुरंग आलदर यांची बृहन्मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंतापदी निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अमित रुपनर यांनी दिली . बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत विद्या पांडुरंग आलदर या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बृहन्मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंतापदी निवड झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकडून नियुक्त पत्र प्राप्त झाल्यांनतर विद्या आलदर ह्या दुय्यम अभियंता पदावरून रुजू होणार असल्याचे त्यांनी सांगीतले . विद्या आलदर यांच्या निवडीबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नॉलवर्णा बिरासाहेब रुपनर , उपाध्यक्षा भाऊसाहेब रुपनर ,सचिव डॉ. अमित रुपनर ,कार्यकारी संचालक दिनेश रुपनर , इस्टेट डारेक्टर डॉ. संजय आदाटे .व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रुपनर , प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे ,उपप्राचार्य डॉ. विद्याराणी क्षीरसागर ,प्रा. धनंजय शिवपुजे ,प्रा. शिवानंद माळी ,प्रा. शरद आदलिंगे ,रुक्मिणी आलदर ,अजय व विजय आलदर आदींनी तिचे अभिनंदन केले.
विद्या आलदर यांची दुय्यम अभियंतापदी निवड
