कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला ऑरेंज अलर्ट जारी….

आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीत तर 205  मिमीहून अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकणात  अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होताच. काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवानाम खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. 

रायगड जिल्ह्याला साकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. तसंच आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच कोणतीही जीवितहानी घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झालंय. महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या किल्ले रायगडवाडी येथील युवक काल दुपारी किल्ले  रायगडच्या शेजारी असणाऱ्या धबधब्यावरून वाहू गेला. त्यांनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासनानकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.