हातकणंगले येथे वाढते प्रदुषण, औषधांचा वाढता वापर, मानसिक तणाव, बदलती जीवनशैलीमुळे हल्ली लोकांचे आयुष्मान कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक उपचाराने आयुष्य निरोगी कसे राखता येईल.हे जाणून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उमेश लांडगे यांनी केले. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअरमार्फत कार्यक्रम घेतला. ग्रीन स्टार आयुरमार्फत उमेश लांडगे व सहदेव रसाळ यांचे मार्गदर्शन शिबीर झाले. रक्तदाब, नाडी तपासणी व मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी होते. स्वागत प्रा.रमेश पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. अमोल महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मनीष साळुंखे आभार मानले.
