मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील सुनावणी…..

एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली लढाई सुरू केली असून शांतता रॅलीच्या माध्यमातून ते मराठा समाजाची भेट घेत आहेत.हिंगोलीतून आपल्या दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर मनोज जरांगेंची रॅली धाराशिवमध्ये दाखल झाली आहे.

तर, दुसरीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू असून आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे.

मात्र, आयोगाचे वकील विदेशात असल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आयोगाच्यावतीने करण्यात आली होती. त्यावर, उच्च न्यायालयाने (High court) तीन आठवड्यांची मुदतवाढ आयोगाला देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून पुढील सुनावणी होणार आहे.