वीज ग्राहकांना दरवाढीचा दुहेरी झटका!

विट्यात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीज दरवाढ मंजुरीनुसार दि. १ एप्रिल २०१४ पासून सरासरी ७ ते ८ टक्के वीज दरवाढ लादली असताना आता महावितरणने अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी व वाढीव इंधन अधिभाराच्या नावाखाली दरवाढ करून वीज ग्राहकांना दुहेरी झटका दिला आहे. या दरवाढीने वीज ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.महावितरणने एप्रिल २०२४ च्या प्रतियुनिट १५ पैसेपासून एक रुपयापर्यंत वाढीव इंधन राज्यात सर्वाधिक दर राज्यात सामान्य वीज ग्राहकांबरोबरच व्यापारी, औद्योगिक ग्राहकांचे वीज दर देशात सर्वाधिक झाले आहेत.

वीज ग्राहकांमध्ये नाराजी आहे. एकाच वेळी दरवाढ, इंधन अधिभाराची आकारणी व अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीमुळे सरळ सरळ १५ टक्के वीज दरवाढ लादली गेली आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून हे दर कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी केली आहे.अधिभाराची आकारणी करून छुपी दरवाढ लादली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज वापरावी की बंद करावी, असा प्रश्न पडला आहे.पूर्वी वीज ग्राहकांच्या सरासरी वीज वापराच्या एक महिन्याएवढी सुरक्षा ठेव ठेवणे बंधनकारक होते. परंतु, २०२२ पासून नियामक आयोगाने ही अतिरिक्त ठेव कशासाठी? वीज बिल वसुली सुलभ करण्यासाठी प्रिपेड मिटर्स बसविण्यास आयोगाने मंजुरी दिली आहे. महावितरणने निविदा प्रसिद्ध करुन सव्वा दोन कोटी स्मार्ट मीटर्स बसविण्याचे नियोजन सुरु केले आहे. प्रिपेड मिटर्स बसविले की सुरक्षा ठेव मागण्याचा प्रश्नच येत नाही.
७ ते ८ महिण्यात प्रिपेड मीटर बसविले जाणार असतील तर मग अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी कशासाठी केली जात आहे. हा सामान्य वीजग्राहकांस प्रश्न पडलेला आहे.सुरक्षा ठेव दोन महिन्यांच्या बिलाएवढी घेण्यास महावितरणला मंजुरी दिली. त्यानुसार मार्चअखेरीस प्रत्येक वीज ग्राहकाच्या वार्षिक वीज वापराचे अवलोकन करून वाढीव वापरानुसार कमी पडणारी रक्कम अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून स्वतंत्र बिलाद्वारे एप्रिलनंतर मागणी केली जात आहे.राज्यातील सामान्य वीज ग्राहकांचा विचार करता ९९ टक्के वीज ग्राहक वेळेवर बिल भरणा करीत असताना केवळ १ टक्के अप्रामाणिक व वेळेवर बिल न भरणाऱ्या ग्राहकांसाठी ९९ टक्के ग्राहकांना वेठीस धरून अन्याय केला जात आहे.महावितरणच्या या मनमानी वीज दरवाढीविरोधात ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रश्नी महावितरणविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.