आजी-माजी आमदारांमध्ये इचलकरंजी जिल्हा की तालुक्यासाठी जुंपली!

इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखले जाते. शहर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण शहराला केंद्र व राज्य सरकारकडून पाहिजे असा निधी मिळत नाही. त्यामुळे शहराची अधोगती होऊ लागली आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्र व्यवहार सुरू केला आहे. तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी स्वतंत्र तालुका भावा त्यासाठी विधानसभेमध्ये मागणी केली आहे.

आजी-माजी आमदारांमध्ये इचलकरंजी जिल्हा व तालुका व्हावा यासाठी चांगलीच जुंपली आहे. तर सध्या महायुतीमध्ये दोघेही काम करत आहेत. लोकसभेला मांडीला मांडी लावून दोघांनी काम केले आहे. पण येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून उभे राहणार का? भाजपमधून राहणार की माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना भाजपचे तिकीट मिळणार की त्यांना मिळणार? आमदार प्रकाश आवाडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेची जोरदार तयारी लावली आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इचलकरंजी जिल्हा की तालुका करण्यासाठी दोघांनीही जीवाची बाची लावली आहे.