इस्लामपुरात डेंग्यूसदृश आजाराने युवकाचा मृत्यू

इस्लामपूर शहरातील शिवनगर परिसरातील ३४ वर्षीय युवकाचा डेंग्यू सदृश आजाराने निधन झाले. त्याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरू होते. फिरोज अहमद शेख असे या युवकाचे नाव आहे. २ जुलै रोजी त्याला ताप आल्याने शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तापाची तीव्रता कमी जास्त होत असल्याने तसेच त्याचा रक्त अहवाल डेंग्यू सदृश आजाराची लक्षणे दाखवणारा आल्याने त्याला अधिक उपचारासाठी
कोल्हापूर येथे हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.