आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. यानिमित्त अनेक भक्त वारकरी हे दिंडी आपल्या गावातून घेऊन ते पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात. आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र रामलिंग बेट बहे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे विटा येथे आगमन झाले. यावेळी माजी आमदार ॲड. सदाशिवभाऊ पाटील यांचे संपूर्ण कुटुंब सक्रिय झाले होते. यावेळी जयश्रीताई सदाशिवराव पाटील, ॲड. वैभव दादा पाटील, प्रतिभाताई पाटील, प्रणितीताई पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांनी दिंडीचे अभूतपूर्व स्वागत व आदरातीथ्य केले. तसेच माऊलीच्या आश्वाचे पूजन पूजन करून मनोभावे दर्शन देखील घेतले.
माऊलीचे नामस्मरण करून पाटील कुटुंबीयांनी परिसर प्रफुल्लित केला आदर्श शैक्षणिक संकुल परिसरात डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी नव्या जोमात आणि जोशात समोर आलेल्या वैभवदादा पाटील आपल्या कुटुंबीयांसोबत फुगडीचा मनमुराद आनंद घेतला तसेच आगामी सर्व निवडणुकांमध्ये आपण सज्ज असून प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर असल्याही झलक वैभव दादा पाटील यांनी दाखवून दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले. दादांच्या या नवीन जोशाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.