विट्यातील अवैद्य धंद्याच्या प्रश्नांवरून संतप्त प्रतिक्रिया…

सध्या भरपूर प्रमाणात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच अनेक अवैद्य धंदे हे खुलेआम सुरू देखील आहेत. विटा शहरांमध्ये देखील असाच प्रकार समोर येत आहे. म्हणजेच विट्यामध्ये अवैद्य धंदा राजरोसपणे सुरू आहे तसेच गुटखा, गांजा हे व्यवसाय विटा शहरांमध्ये जोरदार सुरू आहेत. विट्यामध्ये वेश्या व्यवसाय देखील सुरू झालेला आहे.

तर विटा शहरांमधून अनेक नागरिकांमधून या अवैद्य धंद्याविरुद्ध तक्रारी देखील येऊ लागलेल्या आहेत. विटातील या अवैद्य धंद्यावर सिंह सेना संघटना चांगलीच आक्रमक झालेली आहे. हे अवैध धंदे विटा शहरांमध्ये राजरोजपणे सुरू आहेत तर पोलीस प्रशासन काय करत आहे? पोलीस प्रशासन हे फक्त हप्ता गोळा करण्यात मग्न आहे का? असा प्रश्न सिंह सेना संघटनाच्या वतीने सिंह सेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. तसेच दुसरीकडे महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनीदेखील संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे या अवैद्य धंद्यावर वेळीच कारवाई करावी अशी मागणी सध्या विट्यामध्ये जोर धरू लागलेली आहे.