आ.शहाजीबापूंचा कौतुकास्पद उपक्रम! सोमेश्वरच्या दर्शनासाठी ९ बसेस मधून ४०० महिला रवाना

शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी २८ ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील आयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावणमास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावणमास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल ९ बसेसची सोय करण्यात आली होती. यामधे ४०० महिला सहभागी झाल्या.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने श्रावणमास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

सांगोला शहरातील अयोध्या नगरीपासून महिला भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. या निशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजीबापू पाटील यांच्या यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशी मोफत श्रावणमास यात्रा बुधवार २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.

या श्रावणमास यात्रेला जाण्यासाठी १५ ते ६० वयोगटातील शेकडो मुली व महिलांनी नावनोंदणी केली होती. महिलांसाठी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी अयोध्या नगरी येथून दहा बसेसमधून महिला दर्शनासाठी रवाना झाल्या. या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २८ ऑगस्ट रोजी श्रावणमास यात्रेला प्रारंभ झाला.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख राणी माने, शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरु ठेवण्याची भावना व्यक्त केली. महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे. महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही. मात्र या श्रावणमास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांनी सांगितले. महिलांना एकत्र करुन देवदर्शन घडविण्याचा आमदार शहाजीबापूंचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.