येत्या 19 जुलैला कोल्हापुरात मोर्चा!

विशाळगड हिंसाचारप्रकरणी आता एमआयएम आक्रमक झाला असून 19 जुलै रोजी राज्यातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात धडकणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्या आहेत. दरम्यान सोमवारी इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचारप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता.

शाहू महाराजांचे वंशज हिंसेचा नेतृत्व करतात असं म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केली.विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून येत्या 19 जुलैला कोल्हापुरात धार्मिक स्थळी झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून सांगितले आहे.