संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे, यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर रविवारी विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली. या प्रकरणात आता शाहुवाडी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे नेते मंगळवारी विशाळगडाला भेट देणार आहेत. सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष V.B. पाटील यांच्यासह अन्य नेते विशाळगडवर जाणार आहेत.
इंडिया आघाडीच्या वतीने विशाळगडावर ज्या-ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना मदत घेऊन जाणार आहोत असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलं. सरकार कधी मदत करेल काही माहित नाही मात्र सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही मदत घेऊन जाणार आहोत, असं ते म्हणाले.